फक्त भांडवली अर्थव्यवस्थेमुळे ‘सर्वसमावेशक समाज’ घडवणे अशक्य आहे...
सध्या चालू असलेल्या कोविड-१९च्या महामारीच्या काळात तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील दोष वेगाने समोर आले आहेत. कोणत्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा नसलेले कामगार टाळेबंदीत एका दिवसात रस्त्यावर आले. दूरवर असलेल्या स्वत:च्या घराचा दरवाजा पाहण्यासाठी त्यांना हजारो मैलांची पायपीट करावी लागली. आपण साहसी दृश्ये म्हणून त्याकडे पाहिले असले तरी भांडवलशाही व्यवस्थेचे ते एक भीषण वास्तव होते.......